Posts

Showing posts from July, 2025

अनुदिनी ६८-व्याजदर आणि रोख्याची किंमत / Blog 68–Interest rate and bond price

Image
हातातल्या कागदातील शेवटची भजी मटकावताना सॅम उर्फ समर्थचे लक्ष त्या कागदावरील मजकुराकडे गेले.  ' इंटरेस्ट रेट्स अँड बाँड प्राईस हॅव इन्व्हर्स रिलेशनशिप ',   ' व्याजदर आणि रोख्याची किंमत यांच्यात व्यस्त संबंध असतो. '   " समर्थ , तुलाही वडापाव हवा का ?" अरूकाकांनी आवाज दिला.  " चालेल!"   सँडी अगोदरच गाडीत जाऊन बसलेला , मागोमाग सॅम आणि अरूकाकाही आले.    ते तिघेही पावसाळी पिकनिकच्या पायलट ट्रिपसाठी निघाले होते.    गाडीत सॅमने अरूकाकांसमोर मघाचा कागद फडकावला.   “ काका याबद्दल जरा समजवता का ?” " हो , हो सांगतो!" काकांनी पाण्याचा घोट घेत सुरूवात केली.  " अरे तुम्हाला ‘आयपीओ’ प्रकार परिचयाचा आहे ना ?" " हो!" " तर मग , लोकांकडून निधी गोळा करण्याचाच हा एक प्रकार , पण यावर तुमच्याकडून घेण्यात येणाऱ्या रकमेवर परताव्याचा दर हा सुरवातीलाच अधोरेखित केलेला असतो त्याला ‘कूपन रेट’ म्हणतात. दुसरे असे की बाजारात हे कर्जरोखे निधी गोळा करण्यासाठी सरकारी व निमसरकारी संस्था , आस्थापने या दोघांकडून बाजारात आणले जातात.   आता हे आणताना ज्याप्...