Posts

Showing posts from June, 2024

अनुदिनी ६१ - आजीवन विमा (Whole Life plan) / Blog 60 – Lifelong plan

Image
मृत्यू कोणालाच चुकलेला नाही! ‘सगळे काही माझ्या स्वतःच्याच इच्छापूर्तीसाठी’, असा विचार करणे हे एखादा माणूस कितीही जरी आत्मकेंद्री असला तरी शक्य नाही.  कारण माणूस म्हणून त्याचा स्वतःचा असा गोतावळा हा असतोच. स्वतःच्या पलीकडे ह्या गोतावळ्यातील व्यक्तींसाठी त्याचे मानसिक गुंतणे हे मनुष्य स्वभावाला अनुसरून असल्याने ह्यात जगावेगळे असे काही नाही. उलट तो जर याचा विचारच करत नसेल तर ते वेगळे ठरू शकेल. पण ते शक्य नाही ही काळ्या दगडावरची रेघ!  फरक इतकाच असेल की ह्या गोतावळ्यातील व्यक्तींची संख्या अथवा परीघ कमी अधिक असेल. नमस्कार मंडळी!!!!  काय,  पकलात का? I mean, हे सगळे वाचून बोअर झालात का? अहो,  काय आहे ना आजचा विषयच असा आहे!  अशा प्रस्तावनेशिवाय आजच्या विषयापर्यंत पोहचू शकत नव्हतो म्हणून! असो! तर, आजचा विषय आहे, 'मी आजीवन विमा (Whole life plan) घेऊ की मुदतीचा (Limited term)?' " डॅड! मी आलेच!" इती श्रीधर ह्यांची मोठी मुलगी वृषाली. फार्मा कंपनीत R&D सेक्शनला गेल्या दोन वर्षांपासून लागली. आवडीचा जॉब आणि पॅकेजही उत्तम. आज शनिवार असल्याने मॅडम गाडी घेऊन मित्रांबरोबर फ...