Posts

Showing posts from May, 2024

अनुदिनी ६०- १ - SIP and SWP / Blog 60 – 1- SIP & SWP

Image
धुरळा उडवत जीप एका कौलारु घरासमोर उभी राहिली .   एकेक करून एक , दोन आणि तीन माणसं उतरली. डोक्यावर फेल्ट हॅट , डोळ्यावर गॉगल , हातात फिशिंग रॉड  त्यांच्या गाडीचा आवाज ऐकून गेटवर दोन कुत्रे भुंकत धावत आले. आपण ओळखलं असेलच हे त्रिकूट पिकनिकला आलंय. डोंगराच्या एका टोकाला शांत जलाशयाच्या बाजुलाच टुमदार कौलारु बंगली होती. बाहेर व्हरांड्याच्या समोर गवतावर केनच्या खुर्च्या होत्या , बंगल्याचा केअर टेकर झाडांना पाणी घालत होता. “ शेरी-लुई! कम् हियर!” त्या केअर टेकरने त्या दोन्ही जनावरांना आवरलं. या! असो. मंडळी ,  व्हा की मोकळे आता! अगदी एप्रिल पर्यंत इअरएंडचं काम जोरकसपणे केलंत.   आता जरा निवांतपणा घ्या! हं मंडळी , मला कल्पना आहे की आपण म्हणाल की “राव , असा निवांतपणा तर आम्ही दर महिना अखेरला घेतोच की!” बरोब्बर! पण मी सुचवतोय तो हा असा निवांतपणा ,  आपल्या जिगरी दोस्तांबरोबर आणि तोही दर ३-४ महिन्यांनी!  म्हणजे मंडळी , तेच तेच ऑफिसचे , व्यवसायाचे वगैरे विषय निघत नाहीत. लहानपणीच्या  शाळा - कॉलेजमधील आठवणी , थट्टामस्करी एकदम खळखळून हसवतात आणि विशेष म्हणजे ह्या थट्टाम...