अनुदिनी ४८-'वार्षिकी / Blog 48 - 'Annuity'
"हा, अरे भाई, ये ये!" संदीपने मिलिंदभाईला आत घेतले. संध्याकाळची वेळ होती. घरातली मंडळी डायनींग टेबलभोवती चहाची मस्त तल्लफ भागवत होती आणि सोबत मस्त गरमागरम 'खेकडा-भजी.’ (मंडळी, खेकड्याची भजी नव्हे तर एका विशिष्ठ प्रकारे चिरलेल्या कांद्याची भजी) लगोलग भाईलासुद्धा चहाचा कप आला. संदीपची आई, 'लीलाकाकू' वय वर्षे ६५. शाळेतून निवृत्त झालेल्या त्यांच्यासाठी काही गुंतवणुकीचे पर्याय सुचवण्यासाठी 'मिलिंदभाई' चे आगमन झाले होते. आता लीलाकाकू पेन्शनधारक होत्या, दोन्ही मुले कर्ती-सवरती झाली होती त्यामुळे 'गुंतवणुकीच्या फ्रंटवर' त्या निवांत होत्या. असणारी पेन्शन देखील त्यांना वापरायची गरज पडत नव्हती. येत असलेली काही पेन्शन सरळ बँकेत रिकरिंग खात्यात व काही मुलांच्या आग्रहाखातर म्युच्युअल फंडात, SIP मध्ये जात होती. मोठ्या मुलाच्या ऑफिसमधील मेडिक्लेम पॅालीसीत त्यांचे नाव होते. थोडक्यात मंडळी, लिलाकाकू चांगला बँकबॅलन्स ठेवून होत्या आणि मस्त आनंदाने दिवस जगत होत्या, ढकलत नव्हत्या....