अनुदिनी ४४ - 'नो क्लेम बोनस' / Blog 44 – ‘No Claim Bonus'
“नमस्कार!!” "यावे, यावे!" "आज इकडे कुणीकडे?” “अरे बरेच दिवस भेट नाही म्हंटले बघावे असलास तर!” इती विनयराव. विनयराव आणि बापू शाळेतील मित्र. आता तसे दोघेही रिटायर्ड.तसे म्हणजे नोकरीतून निवृत्त पण काहीतरी उद्योग चालूच. मधल्या काळात बापू सर्वसाधारण विमा (General Insurance) व्यवसायात उतरले तर विनयरावांनी वकिली सुरू केली. “अरे अण्णा! दोन कडक चहा पाठव” बापूंनी आवाज दिला. “नशीब अण्णालाच सांगितलं आहेस म्हणजे चहा मिळणार” विनयरावांनी हसत हसत टोमणा मारला. “लेका, आमच्याकडे ‘नाना’ चहावाला नाहीये” बापूंनी विनयच्या पाठीवर थाप मारत टोमणा टोलावला. “हा! अरे, मी आलो कशाला तर, आता गणपतीत पराग नवीन कार घेतोय.” “मागे एकदा तू कारच्या पॉलिसीवरील 'नो क्लेम बोनस' विषयी बोलला होतास, आता त्याला २/३ वर्षे झाली. तेव्हा म्हंटल आपला हक्काचा माणूस आहे तर समक्ष भेटूनच बोलू आणि समजून घेऊ म्हणून आलो.” इती विनयराव. “साहेब चहा! अण्णाच्या पोराने दोन कटींग टेबलावर आदळले. "अरे काही नाही! एकदम सहज सोपे आहे.” बापू...