अनुदिनी ३६ -'लाईफबॉय, हॅाकिन्स आणि बजाज' / Blog no. 36 - 'Lifebuoy, Hawkins, and Bajaj'
‘लाईफबॉय, हॅाकिन्स आणि बजाज’ नमस्कार मंडळी! काय, कसे आहात? तुम्ही ही जाहिरात बघितली किंवा ऐकलीत का? "तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय लाईफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ" बरं, ही जाहिरात? "ये जमीन ये आसमान, ये जमीन ये आसमान, हमारा कल, हमारा आज, बुलंद भारत की, बुलंद तस्वीर, हमारा बजाज, हमारा बजाज" अरे, काय चाललंय? सांगतो, सांगतो! आणि ही एक शेवटची, "हॅाकिन्स की सिटी बजे खुशबू ही खुशबू उडी मजेदार लज्जतदार खाना है तैय्यार हर खाना स्वादिष्ट बनाये, मिनीटोमें झटपट पकाये हॉकिन्स प्रेशर कुकर" ह्यांचा इथे काय संबंध? सांगतो, सांगतो! बरं, मंडळी आपल्याला लाईफ ईन्शुरन्स काय असतो हे माहित आहे. टर्म प्लॅनचा तर राव, मोठाच गवगवा आहे. आयुर्विम्यात परतावा हा कमी असतो ही माहिती बहुतेकांना आहे. तर, विम्याची मिळणारी रक्कम मग ती मुदत संपल्यावर असू दे किंवा मृत्यूच्या पश्चात, ती करमुक्त असते हे...