Posts

Showing posts from April, 2023

अनुदिनी ३४ – ‘सस्ता रोये बार बार, मेहंगा रोये एक बार’ / Blog 34- 'Sasta roye barbar, Mhenga roye ek bar'

Image
'सस्ता रोये बार बार, मेहंगा रोये एक बार' नमस्कार मंडळी! काय, ह्या सुट्ट्यांच्या मोसमात लॉन्ग ड्राईव्ह चा प्लॅन आहे का नाही? नाही? बरोबर आहे! ह्या उन्हाच्या तडाख्यात बाहेर पडायला नकोसं होत. पण, मंडळी गरमीतच थंडीची मजा अनुभवता येणार ना! बरोबर ना? चला, अगदीच कुठे नाहीतर, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हापूर काय हरकत आहे? चला, गाडी काढा आणि निघा की राव! कार, वरून आठवलं राव आता आपल्या कारमध्ये एअरबॅग असाव्यात असा मानदंड (quality assurance) बंधनकारक करण्यात आला आहे. या आधी एअरबॅग असलेली कार घेणे हे श्रीमंतीचे लक्षण होते. कारमध्ये एअरबॅग असाव्यात हे कायद्याने बंधनकारक केल्याने एअरबॅग असलेली कार हे गुणविशेष न ठरता आता किमान निकष ठरला आहे. आपल्याकडे बघाल ना, तर प्रत्येक वस्तूत 'दर्जाच्या' बाबतीत असा दुजाभाव केलेला आढळेल. म्हणजे हलक्या प्रतीची वस्तू (sub-standard) पर्याय म्हणून दिली जाते हे कितपत योग्य? खरे म्हणजे एअरबॅगला अधिक सक्षम पर्याय असू शकेल, जो सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून ...

अनुदिनी -३३ -'दुसरं अपत्य' / Blog -33 ‘Second Child’

Image
दुसरं अपत्य नमस्कार मंडळी! कसा काय वाटला मार्च महिन्यातील अचानक गारवा? सदा-सर्वकाळ असेच काहीसे तापमान असावे असे वाटले असेल ना! मंडळी ! हा मार्च महिना संपला की 'बॅग भरो निकल पडो' हे शब्द माझ्या कानात घुमायला लागतात. अहो सध्या फिरण्याचे वेड हे लहानांपासून थोरांपर्यंत पसरले आहे. अगदी सेवानिवृत्तीनंतर पण, युरोप नाहीतर दुबई ची ट्रीप ही होतेच. काय बरोबर ना! आणि आजकाल बघाल तर 'साठी' नंतर ही रिटायर्ड मंडळी चांगली हिंडती फिरती उत्साही असतात. का नाही? एकतर निवृत्ती नंतर बऱ्यापैकी एकत्रित रक्कम हातात आलेली असते त्यामुळे खिसा नेहमीपेक्षा जास्तच गरम असतो. तब्येतीचे म्हणाल तर नव-नवीन औषधांमुळे आजाराचं काही विशेष वाटत नाही. मंडळी! असा हा उत्साह पुढेही कायम टिकवायचा प्रयत्न करायचा असेल तर दोन गोष्टी जमेच्या असणे आवश्यक आहे- 'शारीरिक-मानासिक' व 'आर्थिक' तंदुरुस्ती! शरीराच्या व मनाच्या तंदुरुस्ती विषयी नंतर बोलू, सध्या आर्थिक तंदुरुस्ती तीही वयाच्या सत्तरीच्या पुढ...