Posts

Showing posts from March, 2023

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'

Image
घराचा हप्ता रश्मी झोपाळ्यावर बसून छानपैकी कॉफीचा आस्वाद घेत होती. नुकताच त्यांनी काही वर्षांपूर्वी शहरापासून थोडे लांब, एका आटोपशीर टाऊनशिप मध्ये छानसा फ्लॅट घेतला होता. आजूबाजूला भरपूर झाडे असल्याने उन्हाळा जाणवत नव्हता. पुढच्या बाजूला छोटीशी गुलाबाची बागही होती. मार्च महिना असूनही वातावरणात गारवा होता. कॉफीचा मग घेऊन तुषारही झोपाळ्यावर येऊन बसला. वातावरण एकदम मूडी झाले होते. "तु ऽऽऽषार!" रश्मी लटक्या रागात झोपाळ्यावरून उठून सज्जाकडे जाऊन उभी राहिली. "गेली तीन वर्षे आपण कुठेही फिरायला गेलो नाही." "तू आता एकदमच बदलून गेला आहेस!" "You are changed!" "O sss H No Rashmi! असे काही नाही." तुषार तिच्या जवळ जात म्हणाला. "तुला कल्पना आहे, आपण घराचे लोन पूर्ण फेडल्याशिवाय अवाजवी खर्च करणार नाही आहोत. म्हणूनच आपण EMI देखील दुप्पट केला आहे." "हे आपण नाही तू ठरवले आहेस" इति रश्मी. मंडळी! पुढचे संवाद काय असतील आणि शेवट काय...

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

Image
"काय, १ करोड? प्रसंग पहिला: काय, फक्त १ करोड? नाही... नाही शक्यच नाही! अरे सहा महिन्यापूर्वीच बाजूचा प्लॉट दीड करोड पेक्षा जास्तीने गेला. आता आम्हाला गरज आहे म्हणून एवढ्या कमी किंमतीत, शक्यच नाही. प्रसंग दुसरा: "हॅलो आई, माझा आवाज नीट ऐकू येतो आहे का?" अमेरिकेतून प्रशांतचा फोन. "हो, बोला प्रशांत" आई उत्तरली. "अगं, त्या मुरबाडच्या प्लॉट चे काय करायचे?" "अरे! तू ठरवलं आहेस ना विकायचा मग विकून टाकू. शेजारचे परांजपे घ्यायला तयार आहेत आणि किंमत पण बरी मिळते आहे." " अगं हो आई, पण टॅक्स जाऊन जास्ती काही शिल्लक राहणार नाही". इती प्रशांत. "अरे, बापरे!" प्रशांतच्या आईने दीर्घ उसासा टाकला. मंडळी, आर्थिक गुंतवणूक ही पुढील खर्चाचे नियोजन असते आणि स्वाभाविकपणे ते स्वतःसाठी असते तसेच ते नियोजन आपल्या प्रियजनांसाठीही असते. आता प्रत्येक प्रिय व्यक्...