अनुदिनी -२२ 'तुळशी विवाह - विवाह' / Blog-22 'Tulsi Vivah - Vivah'
'तुळशी विवाह - विवाह' नमस्कार मंडळी! कसे आहात ? कशी काय गेली दिवाळी ? खरं तर अजून दिवाळी संपलीच कुठे? अहो, अजून तुळशीचं लग्न कुठे लागलंय! काय, बरोबर ना ? आणि मंडळी तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतरच तर आपल्या जोडीदाराच्या गाठीचे, म्हणजेच लग्नाचे मुहूर्त बघायला सुरवात होते. त्यामुळे इकडे ही दिवाळी सरत आली की दुसरीकडे नात्यातील 'सस्नेह-दिवाळीची' मुहूर्तमेढ पक्की केली जाते आणि हीच तर आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे. तर, असो! मंडळी, बघता बघता 'अनुदिनी' सुरु करून एक वर्ष होत आलं की! आपल्याला हा 'संडे-ब्लॉग' आवडतो, हे कळवले व सांगितले त्या बद्दल धन्यवाद! पण, मंडळी 'आवड' ही व्यक्तीसापेक्ष बाब असते, अगदी गुंतवणूकीच्या बाबतीतही ती व्यक्ती नुसार बदलते. पण, जरी गुंतवणूकीचे ठोकताळे वेगवेगळे असले तरी, बरीचशी आर्थिक उद्दिष्टे ही सामायिक म्हणजे एकसारखी असतात, जसे की...