अनुदिनी - २० 'ओपन टायटल' / Blog -20 'Open Title'
ओपन टायटल दारावरची बेल वाजली, अप्पासाहेबांनी कुरियर घेतलं आणि टीपॉयवर ठेवलं. स्वारी परत पेपर वाचनात गुंग झाली. हे आमचे अप्पासाहेब, नुकतेच रिटायर्ड झाले होते. दोन्ही मुलांची नुकतीच लग्न झाली होती. आता साहेब संसाराच्या जबाबदारीतून अगदी मुक्त झाले होते. ह्या नवीन वळणावर त्यांची गाडी अजून रुळलेली नव्हती. ते थोडे जास्तच निवांत झाले होते. झोपण्या-उठण्याच्या ,खाण्या-पिण्याच्या वेळेचं गणित बसवण्याच्या भानगडीत न पडता त्यांचा आपला मनमौजी दिनक्रम चालू होता. दारावरची बेल वाजली, तुषारने, अप्पासाहेबांच्या मुलाने दार उघडले. हा,या! तुषारने आलेल्या व्यक्तीला बसवलं. "हा फॉर्मचा सेट आहे" ती व्यक्ती उद्गारली. “ह्या सूचना पत्रावर (intimation letter) सही करा आणि सोबत मृत्यूदाखल्याची प्रत जोडा.” त्या व्यक्तीने पुस्ती जोडली. मंडळी, अप्पासाहेब अचानक निवर्तले. हो! हा, सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. कुटुं...