अनुदिनी १८ - “आनंद” / Blog 18 - "Anand"
आनंद मागच्या आठवड्यात मस्त लॉन्ग वीकएंड मिळाला. पावसाची रिपरिप चालू होती आणि मस्त दुपारची झोप होऊन हातात चहाचा कप होता. समोरच शेल्फवर "आनंद" पिच्चरची सीडी दिसली. जे आज ५० - ६० वयाच्या पुढे आहेत, त्यांनी "आनंद" नक्कीच बघितला असणार! अमिताभच्या करियरची सुरवात खऱ्या अर्थाने ह्या पिच्चरने झाली, असं म्हणतात. सोबत होता "काका" म्हणजे "राजेश खन्ना". मला वाटतं "अभिताभ व राजेश खन्नाचा" हा एकमेव सिनेमा असावा. पिक्चरचे स्क्रिप्ट उत्तम होतच पण गाणीसुद्धा भावस्पर्शी होती. "ज़िन्दगी कैसी है पहेली हाय, कभी तो हँसाए, कभी ये रुलाये" मंडळी! ह्यातील शेवटचा सिन एकदम अंगांवर काटे आणणारा! राजेश खन्ना मरणाशी झुंजत असतो त्याला प्रचंड श्वास लागलेला असतो. त्याचे हे हाल इतरांना बघवत नसतात पण ते हताश असतात. काकाला नाटकांची आवड असते त्याच्या एका आवडत्या नाटकातील टेप तो लावायला सांगतो. "मौत तू एक कविता है ..... " . इकडे काका...