राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini
राजेश खन्ना-हेमा मालीनी “ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना” “हो ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना” “ओडले एड्लीई ओ…” काय मंडळी, हे गाणं आपल्या परिचयाचं नसेल असं होणारच नाही. वाचता, वाचता तुम्ही ते मनात गुणगुणायला सुरवात देखील केली असणार. बरोबर ना! अहो, गाण्यातले शब्द तर अर्थपूर्ण आहेतच पण हे गाणं ज्या दोघांवर चित्रित (picturized) केलंय ती, दोघं ही त्यावेळची एकदम सुपरहिट जोडी ना राव! त्यामुळे भट्टी एकदम मस्त जमली! ह्या गाण्यात राजेश खन्ना, हेमामालिनीला घेऊन ज्या प्रकारे बुलेट चालवतो…, त्याचे ठीक आहे राव, तशी गाडी चालवण्याचे त्याला पैसे मिळाले, पण आपलं काय? एकतर, "मामा" आपल्याला बाजूला घेईल आणि आपलंच पाकीट खाली करेल आणि ह्या पावसात अशी गाडी चालवल्यावर, तर आपलं रद्द केलेलं लायसन्स परत मिळवण्यासाठी आपण धडधाकट असू की नाही ते माहित नाही. पण, आयुष्याच्या त्या वळणावर अशी झोकदार डबलसीट गाडी आपण चालवली असेलच, जरी नसेल चालवली, तरी ...