ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire
ज्यूलीचे प्रश्न नमस्कार मंडळी! आज रविवार आणि मला खात्री आहे,आज ब्लॉग वर काय लिहिलंय ह्या उत्सुकतेने आपण आपल्या गॅझेटवर क्लीक केले असणार. काय बरोबर ना! हो, आज थोडासा वेगळा विषय! मंडळी, आमच्या व्यवसायाची पंढरी म्हणून ओळखली जाणारी "मिलिअन डॉलर राऊंड टेबल" ही अमेरिकेत स्थित विशेषकरून विमा क्षेत्रातील उच्च व्यावसायिकांची एक संघटना आहे (Premium Association of Financial Professionals) ह्या ठिकाणी खास करून विमा विक्रीच्या संबंधातील काळानुरूप बदलत जाणारे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. तसेच, वैयक्तिक विकासासोबत समाजातील दुर्लक्षित वर्गाच्या विकासासाठी ही जगभरात कार्यक्रम राबवणे, असे समाजभिमुख कामही, ही संघटना १९३७ पासून करत आहे. मंडळी! माणसासाठी भावनिक गुंतवणूक ही फार महत्वाची असते. संपूर्ण आयुष्यात कळायला लागल्या पासून मनात उद्भवलेल्या भावनांच्या बळावरच तो सर्वसाधारण व्यवहार करत असतो. सर्व धावपळीचं, तथाकथित नियोजनाचं सार हे आपापल्या भावविश्वात राहून एक...