तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !
तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! शेंगदाणा तेल ५ लिटर, साखर ६ किलो, चहा पावडर १ किलो. बाबा, अरे, आता सगळी यादी वाचून दाखवु की काय? प्राजक्ता वैतागून म्हणाली. अग नको, फक्त महत्वाच्या जिन्नसा (items) वाच म्हणालो, म्हणजे काही रहायला नको. तुझ्या शॉपिंग कार्ट मध्ये किती टोटल झाली? डॅड, ६ के!, प्राजक्ता उत्तरली. डॅड, मी मागची शॉपिंग हिस्टरी तपासली सगळ्या जिन्नसा (items) घेतल्यात पण टोटल जवळपास ६०० ने वाढली. अगं, भाववाढ ही होतच असते. चल, असे म्हणून योगेशने आपल्या मुलीलातर पिटाळले पण सहज कुतूहल म्हणून ऍपवर १५ वर्षानंतरची भाववाढ तपासली. मंडळी! खरं पाहिलं तर, एका ठराविक वर्षानंतर आपला खर्च किती वाढला असेल हे नक्की सांगता येणार नाही. पण, साधारण वयाच्या ५० ते ५५ दरम्यान असणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के उत्पन्नाची सोय ही निवृत्ती नंतरच्या पुढील २० ते २५ वर्षाकरिता असलेली उत्तम. आणि हो, ही सगळी खर्चाची गणितं मांडत असतानाच आपल्या मनाला शांतता, विरुंगुळा कशात मिळतो हे ही ह्या वयात चाचपडायला सुरवात...