रिटर्न फ्रॉम मेक्सिको - Return from Mexico
नमस्कार मंडळी ! नुकतेच आम्ही निमिषला भेटायला अमेरिकेत, कनेक्टटिकटला जाऊन आलॊ.कोव्हिडमुळे थोडी वाकडी वाट करून म्हणजे, मेक्सिकोतून जावं लागलं . मेक्सिको नॉर्थ-अमेरिकेत येत असल्याने, संवादाकरिता इंग्रजी व व्यवहाराकरिता डॉलर हे भांडवल पुरेसे असे वाटले होते. पण तिथे गेल्यावर अनुभवलं की, त्यांच्या "पिसो" शिवाय इथे व्यवहार होत नाही. त्यामुळे “पिसो” विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. बँकेत गेलो तर १ डॉलरच्या समोर १८ पिसो मिळत होते. मनात विचार आला, अरे! इथे १८ पिसोच्या समोर १ डॉलर मिळतो आणि आपल्याला त्याकरता ७२ रुपये मोजावे लागले. घटकाभर आपण “पिसो” व “रुपया” ही चलनांची नावं बाजूला ठेवली तर काय दिसून येते? एक देश जास्त चलन मोजत आहे तर दुसरा कमी, असे का ? मंडळी! सरळ आहे, ज्या आवश्यक वस्तूची कमतरता आहे त्याच्या करता ...