Posts

Showing posts from December, 2025

अनुदिनी ७२- माझा दोन करोडचा टर्म प्लॅन आहे / Blog 72 – I have a two-crore term plan

Image
मंडळी , झालं असं , परवा एका कॉलला गेलो होतो.  तो नुकताच एका मुलीचा बाबा झाला होता. आणि साहजिकच त्याला तिच्यासाठी , तिच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करायचं होतं. “काका , माझा दोन करोडचा टर्म प्लॅन आहे!” निखिलने माहिती द्यायला सुरुवात केली.  “सोबत ‘सुकन्या समृद्धी’ घेतली आहे. त्यात जसे जमेल तसे पैसे भरतो.  आणि हो! स्मिताने रागिणीसाठी   ‘ SIP’ सुरू केलीय. आता अजून काय हवं ?” निखिल जरा त्रासिक चेहरा करत विचारता झाला. “हा प्रश्न निखिल तू एकदम बरोबर विचारलास! उद्याचा तुझा भरवसा नाही म्हणून तू दोन करोडचा विमा काढलास. आता तुझ्या ठिकाणी जर मी आहे असा विचार केला , तर ह्या टर्म प्लॅनचे पैसे मिळण्याच्या बाबतीत कोणती शक्यता असेल ?    म्हणजे , मी जर विम्याचा निवडलेला कालावधी पूर्ण केला तर परिपक्व दावा , म्हणजे ‘ Maturity claim’  देय नसेल ; पण कालावधी दरम्यान माझा मृत्यू झाला असेल तर मात्र दोन करोड देऊन जाईन. पण मित्रा , आपल्या ‘रागिणीच्या’ शिक्षणाच्या बाबतीत तर मात्र ‘जर-तर’ संभवत नाही ना रे! तिच्या कोणत्या वयात जास्त रकमेची आवश्यकता आहे आणि साधारणपणे ती किती असेल ह...