अनुदिनी ६७ - निलेकणी / Blog 67 – Nilekani
नमस्कार मंडळी! काय मंडळी , कसाकाय वाटतोय अवकाळी पाऊस ? ऐन मे महिन्यात नद्या , नाले , दुथडी भरून वाहत आहेत. पण राव , अश्या कुंद वातावरणात खासकरून शनिवारच्या दुपारी मस्त ताणून दिल्यानंतर , गरमगरम चहाच्या घुटक्या सोबत एखाद पुस्तक वाचायला एकदम भारी वाटते. मागच्या शनिवारी नंदन निलेकणी ह्यांचं पुस्तक वाचनात आलं. तर मंडळी एखाद्या शनिवारी , मस्त दुपारच्या चहाच्या नाहीतर कॉफीच्या घोटासोबत तुम्ही आणि ‘ ती ’ ( जर कॉफी असली तर) आणि..... ? हा! तर ही जी तिसरी गोष्ट आहे ना , तर खरं बघता या तिसऱ्याची निवांतक्षणी गरजच नसावी तरच खऱ्या अर्थाने छान कीक लागते म्हणा किंवा अगदीच त्याला सोज्वळ शब्दात सांगायचं म्हटलं तर तंद्री लागते. आता ही तंद्री , कीक मन निवांत करण्यासाठी असते , खरंतर असायला हवी. पण होतं काय तर ती तिसरी गोष्ट ही योग क्रिया साधू देत नाही. म्हणजे होतं असं की , मस्तपणे त्या पेयाच्या घोटासोबत त्याचा तो मंद सुगंध आणि जिभेवर रेंगाळणारी चव चाखत कंठामधून तिचा होत असलेला प्रवास हे सगळं अनुभवलं गेलं तर ते पेय पिण्याची लज्जत काही औरच. पण मघाप...