अनुदिनी ६५ - वाढीव हप्ता आणि पूल फंड / Blog 65 -An increased Premium and Pool Fund.
नमस्कार मंडळी! असं कधी आपल्या बाबतीत झालं आहे का ? म्हणजे तुम्ही विमा पॅालीसी घेते वेळी एक प्रिमियम होता आणि ज्या वेळेस तुमचा प्रस्ताव ( Proposal) विमा कंपनीने स्विकारला त्या वेळेस तो वाढला. जर , असं झालं असेल ना तर मंडळी काळजीचं कारण नाही. का ? विचारता. सांगतो , सांगतो! राव , थोडा वेगळा विचार करा! विमा पॅालीसी विकणारी ‘विमा कंपनी’ ही एक कंपनी आहे ना की , धर्मदाय संस्था ? म्हणजे ती फायद्यातच काम करणार. बरोबर ना! हा , तर! तिचा नफा , I mean profit कशात असणार ? विमा पॅालीसीचा कालावधी जर वीस वर्षाचा असेल तर पूर्ण वीस वर्ष प्रिमियम घेण्यात की मधेच मृत्यूदावा ( Death claim) देण्यात ? काय , चक्रावलात का ? हा! बरोबर विचार केलात , पूर्ण वीस वर्षे प्रिमीयम घेण्यात विमा कंपनीचा फायदा आहे , ना की मधील काळात मृत्यूदावा देण्यात! मंडळी , आता विमा कंपनीने विमाप्रस्ताव स्वीकारण्यात तिचा नफा बघितला हे तर तुम्हाला पटलं. बरोबर! ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे कंपनीला खात्री आहे की , ही व्यक्ती पॅालीसीचा कालावधी पूर्ण करणार. काय राव , बरोबर ना ? So, tension not! तुम्ही म्हणाल ...