अनुदिनी ६३ -वार्षिकी / Blog 63- Annuity
नमस्कार मंडळी! मंडळी , बघता बघता नवरात्र संपून दसरा आला आणि गेला की . आता वेध लागले दिवाळीचे. काय बरोबर ना! मंडळी , आपल्या पूर्वजांना मानले पाहिजे ना! . का ? अहो विचार करा , श्रावण महिन्यापासून सणांची जी काही त्यांनी आखणी केली आहे ती , ' बरसात ' अगदी दिवाळी पर्यंत असते. आणि मंडळी श्रावणात भलेही आजूबाजूला सगळा किचकीचाट जरी असला तरी , दहीहंडी म्हणा रक्षाबंधन , गौरी गणपती , नवरात्र सगळे सण आपण एकदम जल्लोषात साजरे करतो. राव , चैत्रात भलेही झाडांना पालवी फुटते पण खरा निसर्ग सजतो तो याच दिवसांत. असो , तर आता आजच्या अनुदिनीचे ( Blog) आणि या सर्व गोष्टींचं काय नातं असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल! तर मंडळी या सर्व घडामोडींमध्ये सुसूत्रता आहे , एक ताल आहे , शाश्वती आहे. या चक्राच्या भरवशावर , सुसूत्रतेवर , आपणच काय तर शेअर बाजार देखील ताल धरून असतो. थोडक्यात काय तर , ' जिंदगीमे भरोसा चाहिये! '. तर , झालं असं! आत्ताच श्रीयुत अप्पासाहेबांचा मृत्यू दावा , (Death claim ) दिला. मंडळी , त्यांनी घेतलेल्या योजनेव...