Posts

Showing posts from July, 2024

अनुदिनी ६२ - Reverse Mortgage / Blog 62 – Reverse Mortgage

Image
  " दो दिवाने शहर में , रात में और दोपहर में ,  आब-औ-दाना ढूँढते है , इक आशियाना ढूँढते है" हा मंडळी करा सर्च गुगलवर!  बरोबर! ' घरोंदा ' सिनेमातील हे गाणं आहे.  घरासाठी एक प्रेमी युगुल काय करायचे ते ठरवतो आणि होते काय!  एकदम भावस्पर्शी सिनेमा आहे राव! म्हणजे आताच्या भाषेत एकदम ' सेन्टी! '  वेळ काढून जरूर बघा. हा , तर , असो! मंडळी घर हे जसे राहण्याचे ठिकाण आहे तसेच ते एक उत्पन्नाचे साधन ही आहे. पण बहुधा हे एक भांडवली नफा ( Capital Gain) करून देणारे अथवा भाड्याच्या (Rent) रूपात  'Passive  Income'  देणारी एक मालमत्ता असेच तिच्याकडे पाहिले जाते. या घराच्या ,  'Reverse Mortgage'  च्या योजने विषयी काही ऐकलंय का ? ह्या योजने विषयी बरेच जण अनभिज्ञ आहेत. तर त्याविषयी थोडेसे. मंडळी! असा विचार करा की आपल्या वयाच्या साठीला आपण कर्ज घेत आहात.  ठीक आहे!  आता हे कर्ज देण्याचा निकष हा तुमच्या स्वतःच्या राहत्या घराच्या विक्रीच्या किंमतीवर अवलंबून असेल. आता ह्या कर्जाचा हप्ता ठरवला जाईल पण तो तुम्ही बँकेला न देता बँकच तुम्हाला महिन्याचा...