अनुदिनी ५४- ‘वार्षिकी- साईंची पालखी- हमारा बजाज’ / Blog 54 - Annuity in Arrears
बळवंतरावांची नाशिकला बदली झाली. सकाळी कारनेच ते निघाले.थोडे लवकर निघून थेट ब्रॅन्चलाच जाण्याचा त्यांनी प्लॅन केला. वीकेंडला दरवेळेस येणे होणार असल्याने सामान जास्ती घेतले नव्हते. हवेत छान गारवा होता. भिवंडी सोडून पडघ्याच्या रस्त्याला गाडी लागली. रस्त्याच्या कडेने साईंची पालखी घेऊन शिस्तीत ५० ते ६० जणांचा समूह पायी चालला होता. त्यात अधिकतर तरुण मंडळींचाच भरणा होता. बळवंतरावांना या गोष्टीचा थोडा विषाद वाटला. नाही म्हटले तरी आठ- एक दिवस ही पदयात्रा चालणार होती. त्यांच्या मनात विचार आला, एवढे दिवस कामधाम सोडून ही तरुण मंडळी अशी पदयात्रा कशी करू शकतात? आपल्या डोक्यातील कामांची यादी तर 'Bucket list' प्रमाणे वाढतच जाते आहे आणि ही तरुण मुलं खुशाल सलग ७-८ दिवस सर्व कामे सोडून अशी पदयात्रा करत आहेत. कामांच्या यादी वरून त्यांना आईच्या पेन्शनच्या कामाची आठवण झाली. गाडी चालवता चालवता ते स्वतःशी पुटपुटले 'अरे यार हे काम अजून बाकीच आहे' असे म्हणून वैतागून त्यांनी स्टेअरिंगवर दोन्ही हात आपटले. मंड...