फुलपुडी - PhulPudi
फुलपुडी नमस्कार मंडळी ! आपल्याला “फुलपुडी” माहित आहे का हो ? म्हणजे पुजेकरीता लागणारी फुले ज्या पानांमध्ये वा कागदात बांधून दिली जातात ती फुलांची पुडी , “ फुलपुडी”. आता ह्यात काय विशेष ? विशेष असे की , ह्या फुलपुडीला बांधलेला दोरा , धागा हा जपून ठेवला जायचा. काय , आश्चर्य वाटलं ना ? अहो , खरंच! त्याचे कारण असं की पुढेमागे गरज पडली की तोच दोरा परत वापरायला होईल. अहो , एवढेच कशाला , कधी एखादं गिफ्ट मिळालं तरी त्याचा रॅपर पण काळजीपूर्वक काढला जायचा व छानशी घडी घालून पलंगावरील गादीखाली ठेवून दिला जायचा. कारण , तेच परत वापरता येईल म्हणून. त्यावेळी म्हणजे साधारण १९८०-८५ च्या दरम्यान ह्या मी अनुभवलेल्या गोष्टी. पण मग हा दोरा , रॅपर या वस्तू बाजारात मिळत नव्हत्या का ? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. मिळत होत्या , पण लोकांकडे खर्च करायला जास्त पैसेच नसत त्यामुळे वापरातील प्रत्येक वस्तू पुरवून वापरण्याकडे कल असायचा. ही झाली त्यावेळची आपल्या चार भिंतीतली अर्थव्यवस्था , म्हणजे आपल्या घरातली. आणि देशातली अर्थव्यवस्था ? व्याजदर ११% , बॅंक लोन १६.५०% , सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ( PPF) ९...