अनुदिनी ६२ - Indexation / Blog 62 – Indexation
कुलकर्णी सरांनी डोळ्यावरचा चष्मा काढून बाजूला ठेवला आणि समोर टीपॅायवर पेपर घडी घालून ठेवला. वाफाळलेला चहाचा कप त्यांची वाट बघत होता. चहाचा एकेक घोट घेत असताना त्यांच्या डोक्यात विचारांचे चक्र चालू होते. तेवढ्यात पिरियड संपल्याची बेल झाली आणि ते हातात पुस्तक घेऊन क्लासरुमकडे निघते झाले पण पिरियड संपल्यावर प्रिन्सिपल परांजप्यांना भेटायचे त्यांनी निश्चित केले. शाळेत कुलकर्णी सर हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. पुस्तकी अभ्यासक्रमाव्यतीरिक्त विषय हे मुलांना कळावेत त्यांची ओळख व्हावी आणि झालीच तर त्याची आवड निर्माण व्हावी म्हणूत ते नेहमी सजग असत, जागरूक असत. मागे ते त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी अमेरिकेत गेले असताना त्यांची एका जपानी प्राध्यापकाबरोबर ओळख झाली. ती व्यक्ती बागकाम ( horticulture ) च्या क्षेत्रात कार्यरत होती. तेथून आल्यावर सरांनी लगोलग मुलांकरिता ‘बोन्साय’ ह्या विषयावर एक सत्र घेतले. नुसतेच क्लासरुम लेक्चर न घेता त्यांनी एका नावाजलेल्या नर्सरीत त्यावर कार्यशाळा पण घेतली. तर, मंडळी सांगायचं काय होतं तर नुकतेच संसदेत बजेट मंजूर झाल्याने त्यांना मुलांना त्या विषयी माहिती देण्याच